लातूर - स्व. अजित पवार यांना रक्तदानातून अभिवादन
लातूर, 26 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त चाकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांच्या पवि
अजितदादा पवार


लातूर, 26 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त चाकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चाकूर तालुका आणि विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प करत, स्व. अजितदादा पवारसाहेबांच्या सामाजिक कार्याला ही खरी आदरांजली ठरली.

प्रसंगी नरेश पाटील चाकूरकर, सर्वोत्तम काका कुलकर्णी, लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे, जिल्हा परिषद सदस्य उषाताई सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भालचंद्र चाटे सर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, सभापती प्रतिनिधी मच्छिंद्र नागरगोजे, उपसभापती प्रतिनिधी भुजंगराव शिंदे, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, उपसरपंच वैभव पाटील, सिद्धेश्वरआप्पा अंकलकोटे, मिलिंदराव महालिंगे, संतोष कमवले, भागवत फुले, विक्रम पाटील, सय्यद इलियास, पपन कांबळे गणपतराव कवठे, मुजम्मिल सय्यद, संचालक यशवंतराव जाधव, प्रतीक केदार, शिवदर्शन स्वामी, मुर्तीजा सय्यद, नरेंद्र हक्के, बालाजी सूर्यवंशी, अनिलराव वाडकर, मधुकर कांबळे, संदीप शेटे, बिलाल पठाण, विश्वनाथ पाटील, भागवत कुसंगे, अशोकराव पाटील, सचिन तोरे, विश्वनाथ पाटील, युवराज सूर्यवंशी, बालाजी गंधगे, नारायण काचे, पवार सर, मधुकर मुंडे, बाळासाहेब पाटील, करीम डोंगरे, दगडूसाहेब पाटील, बाबुभाई दापकेवाले, संजय पाटील, मतीन गुळवे, नितीन पाटील, निलेश भंडे, समाधान जाधव, दयानंद साठे पाटील, उद्धव बिराजदार, अब्दुल शेख, शरद जाधव, काकासाहेब शिंदे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande