वर्धा : वाघाचे वास्तव्य दिसून आल्यानंतर वायफड परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा
वर्धा, 27 जुलै (हिं.स.)नजीकच्या वाठोडा शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य दिसून आल्यानंतर वनविभाग सतर्क झाला या वाधाने कालवडीचा फडशा पाडला. ही घटना माहीत होताच वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले व परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा दिला. मुक्त संचार क
वायफड परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा


वर्धा, 27 जुलै (हिं.स.)नजीकच्या वाठोडा शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य दिसून आल्यानंतर वनविभाग सतर्क झाला या वाधाने कालवडीचा फडशा पाडला. ही घटना माहीत होताच वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले व परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

मुक्त संचार करणारा पट्टेदार वाघ हा सुमारे ३ वर्ष वयोगटातील आणि नर असल्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज असून त्याच्या प्रत्येक हालचालिवर लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सध्या परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत.पट्टेदार वाघाचा मुक्त संचार होत असल्याने वाठोडा, धामणगाव, आमला, वाघधरा, बेलगाव, झाडगाव, लोणसावळी, शेकापूर, जोगाधरी, वायफड या गावातील नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना वनविभागाच्या वतीने दिल्या जात आहे. वाचाने वाठोडा येथील तिर्थराज झाडे यांच्या मालकीच्या कालवडीचा फडशा पाडला. ज्या ठिकाणी वाघाने कालवडीला ठार केले त्या ठिकाणी वनविभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता, याच ट्रॅप कॅमेरात हा वाघ कैदही झाला.

नंतर तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे हा पट्टेदार वाघ आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वाठोडा, धामणगाव, आमला परसोडी भागात आला असावा असा अंदाजही सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने विशेष दक्षता घेत गस्त वाढविण्यात आली आहे. सध्या वाघाच्या प्रत्येक हालचालिवर लक्ष ठेवण्यासाठी जंगल पिंजून काढत आहे.

-------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande