अहमदपूर येथे एकल पालकांच्या मुलींसाठी शिक्षण सहाय्य उपक्रम संपन्न
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। अहमदपूर येथील ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या वतीने एकल पालकांच्या मुलींसाठी शिक्षण सहाय्य उपक्रम राबवण्यात आला असून, नगरसेविका सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव यांच्या हस्ते या मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी
शिक्षण साहित्य वाटप


लातूर, 27 जुलै (हिं.स.)। अहमदपूर येथील ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या वतीने एकल पालकांच्या मुलींसाठी शिक्षण सहाय्य उपक्रम राबवण्यात आला असून, नगरसेविका सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव यांच्या हस्ते या मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेविका सुप्रिया भालेराव यांनी उपस्थित मुलींशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. गेल्या दहा वर्षांपासून ग्रामीण विकास लोकसंस्था हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवत असून, आत्तापर्यंत शेकडो मुलींना या संस्थेने मदत केली आहे. क्रमिक पुस्तके, गणवेश (ड्रेस), नोटबुक्स, छत्री, कलर्स, कंपास, स्टेशनरी, स्कूल बॅग, पाणी बॉटल आणि प्रॅक्टिकल बुक यासह शाळेत लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू व शालेय साहित्य संस्थेच्या वतीने समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून उपलब्ध करून देण्यात येते. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक मच्छिंद्र गोजमे आणि समन्वयक मंगलताई श्रीमंगले यांच्यासह विद्यार्थिनी व माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande