लातूर : भाजपच्या अहमदपूर शहराध्यक्ष पदी गोविंद गिरी यांची निवड
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अहमदपूर शहराध्यक्ष पदी गोविंद गिरी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह
भाजप शहराध्यक्ष


लातूर, 27 जुलै (हिं.स.)। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अहमदपूर शहराध्यक्ष पदी गोविंद गिरी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते गोविंद गिरी यांना शहराध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या महत्वपूर्ण प्रसंगी माजी आमदार बब्रुवान खंदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

अहमदपूर शहरामध्ये पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळापर्यंत विचार पोहोचवण्यासाठी जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी गोविंद गिरी यांना नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या. गोविंद गिरी यांनी यापूर्वी आमदार रमेशअप्पा कराड व दिलीपराव देशमुख यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्य पार पाडले आहे. त्यांच्या याच भूतकाळातील उल्लेखनीय कामाची व पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्षाने त्यांना अहमदपूर शहराच्या शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे.

गोविन्द गिरी यांचा अहमदपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून, ते पूर्णवेळ पक्ष कार्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आणि सर्वसमावेशक नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या निवडीमुळे अहमदपूर शहर आणि परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, आदर, मित्रपरिवार आणि विविध स्तरातून गोविंद गिरी यांचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande