
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विशाल मगरे व शोएब खान यांनी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले आणि युवासेना लोकसभा सचिव शुभम टेकाळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा ठेवून जनतेच्या सेवेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी विशाल मगरे व शोएब खान यांच्यासह महेश नागवे, रवी खुपसे, अक्षय देवडकर, गणेश नन्नवरे, विक्रम जाधव, विशाल भुसारे, अनिल कोलते, नवीद शेख, अफरोज खान, समीर शेख, अनिल मोरे, अमित खंदारे, आशिष उगले, अमन मिर्झा, अनिस शेख, सूरज कसबे, दीपक शेळके, विलास पारखे, सोहम आढे, सोपान देठे, अभिषेक घुले, पृथ्वीराज ढगे, विकी आसारे आणि अजय उदावंत यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना सचिव अभिमन्यूदादा खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मोठ्या प्रवेशामुळे जालना शहरातील शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून आगामी काळात पक्षाची ताकद अधिक वाढण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis