रायगड - 'देवा भाऊ कृषी माऊली' उपक्रमातून महिला शेतकऱ्यांना बळ
रायगड, 27 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने दक्षिण रायगडातील पेझारी येथे ''देवा भाऊ कृषी माऊली'' उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून महिला शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे
कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलीमा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलीमा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रायगड, 27 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने दक्षिण रायगडातील पेझारी येथे 'देवा भाऊ कृषी माऊली' उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून महिला शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, शेतीसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देण्यात आले.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी शेतीत नवे तंत्रज्ञान स्वीकारून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

या उपक्रमाचे आयोजन भाजप दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा 'कृषी माऊली' सोहळ्याच्या जिल्हा प्रभारी श्रेया कंटे यांच्या पुढाकाराने, तर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीला चालना देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande