जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, 27 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषद सदस्य हे लोकप्रतिनिधीच आहेत. आपण स्वतः व पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे एकत्रित बसून जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामांविषयक लवकरच समाधानकारक निधी वितरीत करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश
स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंती दिनानिमित्त सेवा सप्ताह


कोल्हापूर, 27 जुलै (हिं.स.)। जिल्हा परिषद सदस्य हे लोकप्रतिनिधीच आहेत. आपण स्वतः व पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे एकत्रित बसून जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामांविषयक लवकरच समाधानकारक निधी वितरीत करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले .

स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंती दिनानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू छत्रपती सभागृहात वैरण बियाणे वाटप व विविध वैयक्तिक लाभांच्या योजना वितरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जि.प उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिका नांदेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील ,अर्थ व शिक्षण समिती सभापती शितल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड मा.जि.प अध्यक्ष राहूल पाटील , बाबासाहेब आसुर्लेकर आदी उपस्थित होते .

मुश्रीफ म्हणाले,स्वर्गीय अजित पवार यांना कोल्हापूर विषयी अतिशय जिव्हाळा होता. त्यांच्या प्रयत्नांनी कोल्हापूरात अनेक विकास विषयक कामे मार्गी लागली. कोल्हापूरवासियांना पिण्याचे चांगले व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी काळमवाडी धरणातून थेट पाणी पाईपलाईन योजना राबविली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेकडे सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी ॲडव्हान्समध्ये दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेला आपले संपूर्ण सहकार्य असेल अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली .

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी संबंधित लाभार्थ्यांना उच्च प्रतीचे मका व ज्वारी बियाणे, दळणयंत्र, शिलाई मशिन्स, कडबाकुट्टी मशिन्स, स्प्रे पंप, विद्यार्थ्यांना सायकल, लॅपटॉप, झेरॉक्स मशिन्स यांच्यासह इतर अनेक लोकोपयोगी वस्तूंचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.

प्रारंभी प्रास्ताविक शिल्पा खोत यांनी केले. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा दिला.याप्रसंगी जिल्हा परिषदे चे सदस्य , सर्व विभाग प्रमुख ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande