यवतमाळ : मुळाव्याचे आधार सेवा केंद्र सात महिन्यांपासून बंद; १५ गावांतील नागरिक त्रस्त
यवतमाळ, 28 जुलै (हिं.स.) | मुळावा येथील आधार सेवा केंद्र मागील सात महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील सुमारे पंधरा गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अद्यया
यवतमाळ : मुळाव्याचे आधार सेवा केंद्र सात महिन्यांपासून बंद; १५ गावांतील नागरिक त्रस्त


यवतमाळ, 28 जुलै (हिं.स.) | मुळावा येथील आधार सेवा केंद्र मागील सात महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील सुमारे पंधरा गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अद्ययावत करणे यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असून त्यात वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तोंडी व लेखी सूचना करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी यांना आधार केंद्र बंद असल्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुळावा येथे आधार केंद्र सुरू झाल्यास १५ गावांतील हजारो नागरिकांची गैरसोय दूर होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन केंद्र तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आधार कार्डाशी संबंधित छोट्या कामासाठीही १८ किलोमीटर प्रवास करावा लागतो. वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. प्रशासनाने तातडीने मुळावा येथील आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थ मनोज बेद्रे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande