बीड : पिकांना वाचवण्यासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून अतिरिक्त पाणी पाळीची मागणी
बीड, 28 जुलै (हिं.स.)। पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते यांसह मशागतीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सद्यस्थितीत नाश
अ


बीड, 28 जुलै (हिं.स.)। पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते यांसह मशागतीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे. पावसाअभावी पिके वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे जायकवाडी धरण ६० टक्के भरले असून पाण्याची आवक सुरू आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्यातून खरीप हंगामातील संरक्षणात्मक पिकांसाठी एक अतिरिक्त पाणी पाळी तातडीने सुरू करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली. याबाबतचे लेखी निवेदन मुख्य अभियंता सुनंदा जगताप यांना दिले.

गोदावरी नदीपात्रातील शहागड को.प. बंधाऱ्याच्या दरवाजांच्या दुरुस्तीसह पैठण उजव्या कालव्यावरील प्रस्तावित कामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. गेवराई तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वरसह गोदावरीकाठच्या इतर गावांतील शेतकऱ्यांनी शहागड बंधाऱ्यात नादुरुस्त दरवाजांमुळे पाणीसाठा होत नसल्याची तक्रार वारंवार केली होती. शेतकऱ्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

पैठण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास जायकवाडी प्रशासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून पुढील आठवड्यात अतिरिक्त पाणी पाळी देण्यास मंजुरी दिली आहे. शहागड को.प. बंधाऱ्याचे नादुरुस्त दरवाजे दुरुस्त करण्याच्या कामासही मान्यता मिळाली आहे. एकंदरीत आजच्या चर्चेदरम्यान जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande