लातूर -उदगीर शहरात तब्बल चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली
लातूर, 28 जुलै (हिं.स.)।उदगीर शहरातील मोंढा परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सलग चार दुकानांचे शटर उचक
अज्ञात चोरट्यांनी चार दुकाने फोडली


लातूर, 28 जुलै (हिं.स.)।उदगीर शहरातील मोंढा परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल चार दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सलग चार दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. काही ठिकाणी रोख रक्कमवर हात साफ केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोंढा परिसरात रात्रीच्या वेळी नियमित व प्रभावी पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande