
बीड, 28 जुलै (हिं.स.)। आज स्व. अजितदादा यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाला बरोबर ६ महिने पूर्ण होत आहेत. प्रत्येक महिना सरतोय, पण डोळ्यांच्या कडा आजही तितक्याच ओलावलेल्या आहेत. अशी प्रतिक्रिया गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.
माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, नुकतीच आपण दादांची पहिली जयंती साजरी केली. तो दिवस त्यांच्या अफाट कार्याची आणि नेतृत्वाची साक्ष देणारा होता, पण त्याचवेळी त्यांच्या नसण्याची पोकळी अधिकच गडद करणारा ठरला. काळ पुढे सरकत आहे, पण दादांच्या आठवणी तिथेच साकळून राहिल्या आहेत. दादा, तुमची उणीव प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक क्षणाला जाणवते. तुम्ही आमच्यात नाही या सत्याचा स्वीकार करणे आजही तितकेच कठीण आहे. स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis