नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्फ्यू; सांप्रदायिक तणाव कायम
काठमांडू, 28 जुलै (हिं.स.)।भारताच्या सीमेलगत असलेल्या नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कर्फ्यू लागू ठेवण्यात आला आहे. सांप्रदायिक हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. या हिंसाचारात एका व्यक्तीचा म
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्फ्यू; सांप्रदायिक तणाव कायम


काठमांडू, 28 जुलै (हिं.स.)।भारताच्या सीमेलगत असलेल्या नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कर्फ्यू लागू ठेवण्यात आला आहे. सांप्रदायिक हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सुनसरी जिल्हा प्रशासन कार्यालयाने (डीएओ) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक भागांत कर्फ्यू आणि निषेधाज्ञा लागू राहणार आहे.

डीएओने जारी केलेल्या सूचनेनुसार, हरिनगर आणि देवघगंज या संपूर्ण ग्रामीण नगरपालिकांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच हरारिनगर, भुताहा, कप्तानगंज, घुस्की आणि देवगंज या पाच भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. प्रशासनाने या भागांमध्ये मोर्चे, निदर्शने, सार्वजनिक सभा, धरणे तसेच चारपेक्षा अधिक लोकांच्या जमावबंदीवर बंदी घातली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुनसरी जिल्ह्यातून जाणाऱ्या ईस्ट-वेस्ट महामार्गावरील कर्फ्यू सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिथिल करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला.रविवारी कप्तानगंज परिसरात सांप्रदायिक हिंसाचार भडकला होता. त्यानंतर सोमवारी प्रथमच जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन धार्मिक समुदायांच्या उत्सवादरम्यान झालेल्या वादानंतर दोन गटांमध्ये संघर्ष उफाळला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.दक्षिण-पूर्व नेपाळमधील सुनसरी जिल्हा हा भारतातील बिहार राज्याच्या सीमेलगत असून, भारत आणि नेपाळ यांच्यातील महत्त्वाचा वाहतूक व व्यापारी मार्ग (ट्रान्झिट आणि कमर्शियल कॉरिडोर) म्हणून ओळखला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande