इराणकडून अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना लक्ष्य करणारा व्हिडिओ जारी
तेहरान, 28 जुलै (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प आणि त्यांचा मुलगा बॅरन ट्रम्प यांना लक्ष्य करणारा इराणमधून अमेरिकाविरोधी प्रचाराचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इस्लामी राजवटीच्या समर्थकांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्
इराणने अमेरिकेच्या फर्स्ट महिला मेलानिया ट्रम्प यांना लक्ष्य करणारा व्हिडिओ केला जारी


तेहरान, 28 जुलै (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प आणि त्यांचा मुलगा बॅरन ट्रम्प यांना लक्ष्य करणारा इराणमधून अमेरिकाविरोधी प्रचाराचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इस्लामी राजवटीच्या समर्थकांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीच्या हत्येसाठी सूचना दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘मेलानिया ट्रम्प यांची हत्या कशी करावी’ या नावाने हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांची छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या ताफ्याचे आणि न्यूयॉर्क शहरातील काही ठिकाणांचे दृश्यही समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, त्या खरेदीसाठी जात असलेल्या डिझायनर दुकानांची नावेही व्हिडीओमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मेलानिया ट्रम्प यांच्या खरेदीशी संबंधित या हालचाली जगभरातील तथाकथित “स्वातंत्र्यसैनिकांच्या” मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकतात. तसेच कपड्यांमध्ये विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्याचा उल्लेख करण्यात आला असून, हा पदार्थ मानवी मज्जासंस्थेला गंभीर हानी पोहोचवू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.या प्रकरणावर ईस्ट विंग किंवा अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. व्हिडीओच्या शेवटी २० वर्षीय बॅरन ट्रम्प यांनाही धमकी देण्यात आली आहे. त्यामध्ये, “ही तर केवळ सुरुवात आहे. बॅरन ट्रम्प, आमची वाट पाहा,” असे म्हटले आहे. मेलानिया ट्रम्प आणि बॅरन ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी चोवीस तास तैनात असतात. तसेच ट्रम्प कुटुंबाच्या सर्व निवासस्थानांवर – व्हाईट हाऊस, न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर, बेडमिन्स्टर गोल्फ क्लब आणि फ्लोरिडामधील मार-ए-लागो इस्टेट – कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

इराणसोबतचा संघर्ष सुरू झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कुटुंबीयांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात तेहरानमध्ये अनेक ठिकाणी असे फलक (होर्डिंग्ज) लावण्यात आले होते, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचे आवाहन केल्याचा दावा करण्यात आला होता. या फलकांमध्ये मेलानिया ट्रम्प तसेच त्यांची सर्व मुले – डॉन ज्युनियर, इव्हांका, एरिक, टिफनी आणि बॅरन ट्रम्प – यांची नावे नमूद करण्यात आली होती. फलकांवर “रक्ताच्या बदल्यात रक्त” असा मजकूर लिहिण्यात आला होता.

दरम्यान, मेलानिया ट्रम्प यांनी या महिन्यात फार कमी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्या शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या व्हाईट हाऊस प्रेस कॉर्प्सच्या वार्षिक भोजन समारंभालाही उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचे इतर कार्यक्रम आधीच निश्चित झाले होते, त्यामुळे त्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही इराणकडून धमक्या मिळाल्याचे वृत्त आहे. त्यांनी स्वतःही आपण इराणच्या निशाण्यावर असल्याचे मान्य केले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते तसेच शासनाशी संबंधित अनेक व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande