रावळकोट येथील निदर्शकांवर पाकिस्तानी पोलिसांकडून गोळीबार; १४ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद , 28 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये मंगळवारीही तणाव कायम राहिला. रावळकोट येथे निवडणुकांविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली, ज्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आ
रावळकोट येथील निदर्शकांवर पाकिस्तानी पोलिसांकडून गोळीबार; १४ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद , 28 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये मंगळवारीही तणाव कायम राहिला. रावळकोट येथे निवडणुकांविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली, ज्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतरही आंदोलनकर्त्या नेत्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सायंकाळी रावळकोटमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला. संयुक्त अवामी कृती समिती (जेएएसी) चे प्रमुख सदस्य इम्तियाज असलम यांनी म्हटले, “पाकिस्तानच्या दडपशाही करणाऱ्या शक्तींनी आज आमच्या निरपराध तरुणांवर गोळीबार केला. त्यात आमचे १४ तरुण मृत्युमुखी पडले.” ते पुढे म्हणाले, “परदेशात राहणाऱ्या काश्मिरी बांधवांना मी जोरदार आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानच्या दूतावासांबाहेर, जगभरातील मानवाधिकार संघटनांसमोर आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएन) कार्यालयांबाहेर निदर्शने करावीत.”

ही घटना अशा वेळी घडली, जेव्हा संयुक्त अवामी कृती समिती (जेएएसी) आणि प्रशासन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हजारो लोक मुजफ्फराबादकडे मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर उतरले. आंदोलक मागील ५२ दिवसांपासून आंदोलन करत असून अटक करण्यात आलेल्या लोकांची सुटका, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे आणि इतर मागण्या मान्य करण्याची मागणी करत आहेत.

अहवालानुसार, जेएएसीने २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करून अधिकृत अधिसूचना जारी करण्यासाठी मुदत दिली होती. समितीने इशारा दिला होता की तसे न झाल्यास हजारो लोक रावळकोट ते मुजफ्फराबाद असा मोर्चा काढतील. निर्धारित वेळेत कोणताही तोडगा न निघाल्याने मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि मोर्चा सुरू झाला. त्याचदरम्यान रावळकोटमध्ये परिस्थिती बिघडल्याचे आणि गोळीबार झाल्याचे आरोप समोर आले.

रावळकोटच्या ड्रेक ईदगाह परिसरात हिंसाचार उसळला. येथे मोठ्या संख्येने लोकांनी कथितरित्या निवडणुकांवर बहिष्कार टाकत आंदोलनासाठी एकत्र जमल्याचे सांगितले जात आहे.जेएएसी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, पाकिस्तानी लष्कराचे जवान, पंजाब रेंजर्स आणि पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. आंदोलकांचा आरोप आहे की सुरक्षा दलांनी जिवंत काडतुसे, लांब पल्ल्याचे अश्रुधूराचे गोळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केलेल्या स्नायपर्सचा वापर केला.

हिंसाचारानंतर आंदोलकांनी दावा केला की रावळकोटकडे येणारे सर्व प्रमुख मार्ग त्यांनी अडवून ठेवले आहेत. पीओकेच्या इतर भागांमध्ये मतदान पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा दल शहरात दाखल होऊ नयेत, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनी असा आरोपही केला की प्रशासनाने संपूर्ण संपर्क व्यवस्था विस्कळीत केली होती. वृत्तांनुसार, परिसरातील काही भागांमध्ये मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रावळकोटमधील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण असून, कठोर निर्बंधांनंतरही हजारो आंदोलक शहरात एकत्र जमल्याचे वृत्त आहे.

अहवालानुसार, हा घटनाक्रम अशा वेळी घडला जेव्हा पीओजेकेच्या मीरपूर विभागातील १३ जागांसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होता. दरम्यान, कोटली येथून हिंसाचार आणि निवडणुकीतील गैरव्यवहारांचे आरोपही समोर आले. दीर्घकाळ सुरू असलेल्या संप आणि आंदोलनांमुळे राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात अडचणींचा सामना करावा लागला. सार्वजनिक सभा, रॅली आणि घराघरांत जाऊन करण्यात येणारा प्रचार यावर परिणाम झाला. तसेच सुधनोती आणि रावळकोट जिल्ह्यांतील विधानसभा निवडणुका १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे संपूर्ण प्रदेशातील राजकीय घडामोडींवरही परिणाम झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande