नाशिक जिल्ह्यात गुटखा व सुगंधित तंबाखूविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
नाशिक, 31 जुलै (हिं.स.) : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. एस. देव
Banned gutkha stock worth


नाशिक, 31 जुलै (हिं.स.) : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

हरसूल पोलीस स्टेशन हद्दीत सलमान बाबाखान शहा याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1 लाख 8 हजार 666 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी हरसूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 0095/2026 दाखल करण्यात आला असून, ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड यांनी केली.

मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलीस स्टेशन हद्दीत साजिद अख्तर मोहम्मद मुस्तफा अन्सारी याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत 2 लाख 1 हजार 800 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा आणि 3 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण 5 लाख 1 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा क्रमांक 0115/2026 दाखल करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सोनल पडाळे आणि श्रद्धा रहिंज यांनी केली.

पेठ पोलीस स्टेशन हद्दीत योगेश नंदलाल सोनजे याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 54 हजार 775 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 0151/2026 दाखल करण्यात आला असून, ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी केली.

या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील संबंधित कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande