परभणी - जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
परभणी, 31 जुलै, (हिं.स.)। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात परभणी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक कारवायांची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत आजपर्यंत आरोपींना विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून
परभणी - जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


परभणी, 31 जुलै, (हिं.स.)। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात परभणी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक कारवायांची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत आजपर्यंत आरोपींना विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ३८ आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४९ आरोपींवर बॉण्ड उल्लंघनाची कारवाई करण्यात आली आहे. ही प्रतिबंधात्मक कारवाई परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारांसाठी इशारा असल्याचे परभणी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत भारतीय न्याय संहिता कायद्याच्या १२६ व १२९ अन्वये आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी पोलिसांनी मागील दोन महिन्यात बॉण्डच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांची न्यायालयाच्या आदेशाने कोठडीत रवानगी करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १२६ व १२९ अन्वये जिल्ह्यातील ३ हजार ५६६ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून अंतरिम आणि अंतिम बंधपत्रे भरून घेण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या नियंत्रणात तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिस अंमलदार ज्योती चौरे व शेख फराह यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande