अमेरिकेकडून इराणला तेल विक्रीची परवानगी देणारा परवाना रद्द
वॉशिंग्टन , 08 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने इराणी तेल विक्रीस परवानगी देणारा परवाना रद्द केला आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाने मंगळवारी याची माहिती दिली. वित्त विभागाने गेल्या महिन्यात ६० दिवसांसाठी हा परवाना जारी केला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष समा
अमेरिकेकडून इराणला तेल विक्रीची परवानगी देणारा परवाना रद्द


वॉशिंग्टन , 08 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने इराणी तेल विक्रीस परवानगी देणारा परवाना रद्द केला आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाने मंगळवारी याची माहिती दिली. वित्त विभागाने गेल्या महिन्यात ६० दिवसांसाठी हा परवाना जारी केला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष समाप्त करण्यासाठी झालेल्या अंतरिम करारानुसार इराणी तेलावरील निर्बंधांमध्ये ही सवलत देण्यात आली होती. मात्र, हा परवाना कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आला,

याबाबत वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा ब्रिटिश सैन्याने होर्मुझ सामुद्रधुनीत तीन तेलवाहू टँकरांवर ड्रोनद्वारे हल्ला झाल्याचे सांगितले. अलीकडच्या काळात या महत्त्वाच्या सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर झालेला हा ताजा हल्ला आहे. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध कायमस्वरूपी समाप्त करण्यासाठी चर्चा सुरू आहेत. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयानंतर इराणसोबत झालेल्या अलीकडील करारावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. हा करार किती काळ टिकेल, याबाबत संभ्रम कायम आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande