सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा दुसरा विजय; वान फॉरेस्टचा केला पराभव
सेंट लुईस, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने सिंकफील्ड कप २०२६ मध्ये शानदार पुनरागमन करत चौथ्या फेरीत नेदरलँड्सच्या ग्रँडमास्टर जोरडेन वान फॉरेस्टचा पराभव केला. स्पर्धेतील हा प्रज्ञानानंदचा दुसरा विजय आहे. या विजयासह तो २.५ ग
Sports Chess Sinquefield Cup Praggnanandhaa


सेंट लुईस, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने सिंकफील्ड कप २०२६ मध्ये शानदार पुनरागमन करत चौथ्या फेरीत नेदरलँड्सच्या ग्रँडमास्टर जोरडेन वान फॉरेस्टचा पराभव केला. स्पर्धेतील हा प्रज्ञानानंदचा दुसरा विजय आहे. या विजयासह तो २.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानानंदसमोर वान फॉरेस्टने सिसिलियन डिफेन्सचा आधार घेतला. भारतीय ग्रँडमास्टरने चौथ्याच चालीत आपला वजीर सक्रिय केला, तर वान फॉरेस्टने किंग साइड कॅसलिंग केले. सामन्याच्या १४व्या चालीत वान फॉरेस्टने आपल्या वजीराच्या बदल्यात हत्ती आणि उंट मिळवला.मात्र, प्रज्ञानानंदने आपल्या चालींचा वेग आणि दबाव कायम ठेवत डच खेळाडूला सतत अडचणीत ठेवले.

दोघांमधील सामना लांबला आणि ७१व्या चालीपर्यंत रंगला. वान फॉरेस्टने हत्तीच्या मदतीने प्रज्ञानानंदच्या प्यादे आणि वजीराविरुद्ध संघर्ष सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय ग्रँडमास्टरच्या सातत्यपूर्ण दबावापुढे अखेर त्याला हार मानावी लागली. चार फेऱ्यांनंतर अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो ३ गुणांसह एकट्याने अव्वल स्थानावर आहे. आता पाचव्या फेरीत प्रज्ञानानंदचा सामना वेस्ली सोसोबत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande