जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.)आगामी आशिया कप आणि आशियाई खेळांपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडली आहे. ३ ऑगस्ट रोजी इंग्लंडमध्ये ''द हंड्रेड'' स्पर्धेत खेळताना जेमिमाला उजव्या
जेमिमा रॉड्रिग्ज


नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.)आगामी आशिया कप आणि आशियाई खेळांपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडली आहे. ३ ऑगस्ट रोजी इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' स्पर्धेत खेळताना जेमिमाला उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तिची तपासणी केली. तपासणीत हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाले. परिणामी, ती आगामी एसीसी महिला आशिया कप आणि जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमधून बाहेर पडली आहे.

महिला निवड समितीने जेमिमाच्या जागी आशिया कपसाठी भारतीय संघात प्रतिका रावलची निवड केली आहे. आशिया कप युएईमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाची कर्णधार असेल, तर स्मृती मंधानाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

२८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. सर्वात यशस्वी संघ, भारत, ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबतचा बहुप्रतिक्षित सामना ५ सप्टेंबर रोजी होईल. भारतीय संघाला पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग आणि चीन यांच्यासोबत 'अ' गटात स्थान देण्यात आले आहे. 'ब' गटात गतविजेता श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया आणि यजमान संयुक्त अरब अमिराती (युएई) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande