ऐतिहासिक विक्रम! लाल किल्ल्यावरून सलग १३व्यांदा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला केले संबोधित
- नेहरूंनंतरचे ठरले दुसरे पंतप्रधान नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यासह त्यांच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. सलग
स्वातंत्र्य दिवस लाल किल्ला ध्वजारोहण पंतप्रधान मोदी


स्वातंत्र्य दिवस लाल किल्ला ध्वजारोहण पंतप्रधान मोदी


स्वातंत्र्य दिवस लाल किल्ला ध्वजारोहण पंतप्रधान मोदी


स्वातंत्र्य दिवस लाल किल्ला ध्वजारोहण पंतप्रधान मोदी सलामी


- नेहरूंनंतरचे ठरले दुसरे पंतप्रधान

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यासह त्यांच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. सलग १३व्या वर्षी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवत राष्ट्राला संदेश देणारे नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

२०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले आहे. यंदाचे त्यांचे सलग १३वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ठरले. या कामगिरीसह त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सलग ११ वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण देण्याचा विक्रम मागे टाकला आहे.

इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७६ या कालावधीत सलग ११ वेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले होते. तर भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण देण्याचा विक्रम आजही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी १९४७ ते १९६३ या कालावधीत सलग १७ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून देशाला संबोधित केले.

दरम्यान, स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सुरुवात पारंपरिक उत्साह, अभिमान आणि दिमाखात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला. त्यानंतर भारतीय सैन्याने २१ तोफांची सलामी दिली आणि पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande