२०३६ ऑलिम्पिकसाठी देशभरात प्रतिभा शोधमोहीम, पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, सर्व क्रीडा प्रकारांमध्ये देशाची उपस्थिती मजबूत करण्यासाठी ५ ते १५ वयोगटातील युवा प्रतिभावंतांना ओळखण्याकरिता देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची घोषणा केल्याने, २०३६ ऑलिम्पिकच्या यजमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, सर्व क्रीडा प्रकारांमध्ये देशाची उपस्थिती मजबूत करण्यासाठी ५ ते १५ वयोगटातील युवा प्रतिभावंतांना ओळखण्याकरिता देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची घोषणा केल्याने, २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठीच्या भारताच्या बोलीला आणखी बळ मिळाले आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये सुरू झाल्यापासून प्रमुख 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' (TOPS) ने यश मिळवले आहे.

“भारत क्रीडाविश्वात आपले स्थान निर्माण करत आहे. आपण आपले राष्ट्रगीत वारंवार ऐकतो आणि आपला तिरंगा अनेकदा फडकताना पाहतो. 'टॉप्स'ने मोठे यश मिळवले आहे. खेलो इंडिया गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, बीच गेम्स, विंटर गेम्स असोत किंवा क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा पोषण असो, भारत मोठ्या वेगाने पुढे जात आहे,” असे ते म्हणाले. मोदींनी आग्रह धरला की, प्रस्तावित प्रतिभा शोध कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारचा हा प्रयत्न सर्व ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये देशाची उपस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने आहे.

भारताची कामगिरी सुधारत आहे आणि २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी आम्ही प्रबळ दावेदार आहोत. आम्ही २०३० मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करत आहोत. ऑलिम्पिकमध्ये सुमारे ४० क्रीडा प्रकार असून, त्यात जवळपास ३५० स्पर्धांचा समावेश असतो. ही खेदाची बाब आहे की, आम्ही पात्रही ठरू शकत नसल्यामुळे यापैकी किमान दोन-तृतीयांश स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही.

आम्ही ठरवले आहे की २०३६ मध्ये, किमान तीन-चतुर्थांश स्पर्धांमध्ये आमचा सहभाग असावा. देशाच्या कानाकोपऱ्यातील आश्वासक खेळाडू ओळखण्यासाठी आम्ही ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी प्रतिभा शोध मोहीम सुरू करत आहोत. त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande