
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी केज येथील शेतीनिष्ठ शेतकरी ॲड दिलीप करपे यांची निवड करण्यात आली आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे ॲड करपे यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली, यात उपाध्यक्ष म्हणून जवळबन ता. केज येथील ॲड दिलीप करपे यांची निवड करण्यात आली आहे. ॲड करपे हे व्यवसायाने वकिल असून शेतीवर त्यांचे प्रचंड प्रेम आहे. अंबाजोगाई येथे नुकतेच त्यांनी सेंद्रीय शेती उत्पादन विक्रीचे शाॅप सुरू केले आहे. विशेष म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून ते पक्ष संघटना व नेतृत्वाशी जोडले गेलेले आहेत, शेतीवरील त्यांची आवड व निष्ठा पाहून ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांना किसान मोर्चावर काम करण्याची संधी दिली, या निवडीबद्दल ॲड करपे यांनी पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis