
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले हे २१ व २२ ऑगस्ट रोजी परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर व बदलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या परभणी दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला असून विविध मान्यवरांच्या भेटींसह ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
दामले हे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बदलापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार असून रात्री तेथे मुक्काम करतील. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे प्रयाण करून सकाळी १० वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे.सकाळी १०.२० वाजता कॅप्टन दामले हे श्री. शंतनू सुभेदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.४० वाजता ब्राह्मण समाज आयोजन समितीचे सदस्य श्री. योगेश जोशी सोनपेठकर यांच्या प्रभाती नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ब्राह्मण समाज, परभणी यांच्या वतीने आयोजित ‘ब्राह्मण समाज संवाद यात्रा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनासह ‘संवाद बैठक’ कार्यक्रमास कॅप्टन दामले उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सरदेशपांडे हुरडा पार्टी अॅण्ड टुरिझम, पाथरी रोड, परभणी येथे होणार आहे.दुपारी २.३० वाजता महिला उद्योजिका सौ. निशा कुलकर्णी वझुरकर यांच्या ‘पिझ्झा या आस्थापनेस’ सदिच्छा भेट देणार असून त्यानंतर दुपारी ३ वाजता परभणीहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल हयात प्लेस येथे आगमन व मुक्काम असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.दरम्यान, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने आवश्यक त्या सुरक्षा व सोयी-सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis