
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नाही. हा काळ स्वतःचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले. येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या वतीने पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ राजकुमार बोलत होते.
प्रा. डॉ. संजय दळवी यांनी प्रास्ताविकात, महाविद्यालयातील विविध समित्या आणि विभाग यांची सविस्तर माहिती दिली. उपप्राचार्य डॉ.जितेंद्र पुल्ले यांनी महाविद्यालयात असणाऱ्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल विषयी माहिती सांगितली. डॉ. प्रकाश भांगे यांनी, विद्यार्थ्यांनी महाविद्यात नियमित आल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि हेच ज्ञान भविष्यात यश संपादन करण्यासाठी मदत करेल, असे सांगितले. तर डॉ.अल्का कौसडीकार यांनी, महिला तक्रार निवारण समिती संदर्भात संदर्भात माहिती देऊन त्याचे उद्देश व समितीच्या कार्याविषयी माहिती देऊन विद्यार्थिनींना काही अडचण असेल तर त्या संदर्भात निवारण करण्याची हमी दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी विकासकक्ष प्रमुख डॉ. विजय पवार यांनी केले. आभार सांस्कृतिक विभागाच्या डॉ. वृषाली आंबटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शिवसांब कापसे, डॉ. संतोष चांडोळे, डॉ. राजीव यशवंते, डॉ. सोमनाथ गुंजकर डॉ. अंबिका चोंडे डॉ. वर्षा धुतमल, प्रा. नसीर शेख डॉ .शिंदे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयीन कर्मचारी मंचक वळसे, कालिदास वैद्य यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis