परभणी - ग्रामसभा आयोजनात सुधारणा करा; ग्रामपंचायत अधिकारी युनियनची मागणी
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामसभेसंबंधी तरतुदींमध्ये ग्रामसभा बैठकांची संख्या कमी करणे, ग्रामसभा आयोजन व नियोजनाबाबत आवश्यक प्रशासकीय सुधारणा करणे तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने
ग्रामसभा आयोजनात सुधारणा करा -ग्रामपंचायत अधिकारी युनियनची मागणी


परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामसभेसंबंधी तरतुदींमध्ये ग्रामसभा बैठकांची संख्या कमी करणे, ग्रामसभा आयोजन व नियोजनाबाबत आवश्यक प्रशासकीय सुधारणा करणे तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यासह विविध मागण्या ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ च्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभाग सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामसभेसंबंधी तरतुदीनुसार ग्रामसभेच्या बैठका घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठका) नियम, 1959 मधील संबंधित तरतुदींनुसार विविध कालावधीत ग्रामसभा आयोजित करण्याची व्यवस्था आहे. मात्र, कालांतराने ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम, सेवा व आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर संगणकीकृत व ऑनलाइन झाले आहेत. योजनांची माहिती संकेतस्थळे, संगणक आज्ञावली, सामाजिक माध्यमे, प्रसारमाध्यमे, सार्वजनिक फलक तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत सध्याच्या काळात ग्रामसभांची वारंवारता, विषयांची संख्या आणि बैठकींचे स्वरूप यांचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande