अंबाजोगाईत कॉईन गेम जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कॉईन गेम जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईत दहा कॉईन गेम मशिन्स, मोबाईल फोन, ऑनलाइन स्कॅनर आणि रोख रकम
पोलीस कारवाई


बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कॉईन गेम जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईत दहा कॉईन गेम मशिन्स, मोबाईल फोन, ऑनलाइन स्कॅनर आणि रोख रकमेसह सुमारे १ लाख ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कागणे, पोलीस हवालदार नागरगोजे, खेलबुडे तसेच पोलीस अंमलदार खंदारे आणि केदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यात पैशांची पैज लावून कॉईन गेम खेळवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. त्यावेळी खेळणारे पळून गेले, मात्र जुगार चालवणारे जमीर इस्माईल शेख (वय ३६ वर्षे, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) आणि नंदकुमार मधुसूदन सुतळे (वय ४५ वर्षे, रा. हनुमान नगर, अंबाजोगाई) हे जागीच मिळून आले.

अंगझडती व गाळ्याच्या तपासणीदरम्यान जुगारासाठी लागणाऱ्या दहा कॉईन मशिन्स, ९९ लोखंडी कॉईन्स, दोन मोबाईल आणि गुगल पे स्कॅनर असा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार मुकेश प्रल्हाद खरटमोल (वय ४० वर्षे) यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत नागरगोजे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande