उच्च शिक्षणातील प्रवेश वाढविण्यासाठी अकोल्यात एकदिवसीय परिसंवाद
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)। मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या वतीने “ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील प्रवेश वाढविणे” या विषयावर रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी अकोल्यात एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा क
उच्च शिक्षणातील प्रवेश वाढविण्यासाठी अकोल्यात एकदिवसीय परिसंवाद


अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या वतीने “ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील प्रवेश वाढविणे” या विषयावर रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी अकोल्यात एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रहबर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अकोलाचे सीईओ श्री. शकील अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

हा परिसंवाद हक फंक्शन हॉल, फिरदौस कॉलनी, अकोला येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा तालीमी कारवाँचे चेअरमन खान मोहम्मद अझहर हुसेन राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रा. रजाउल्लाह खान, संचालक, सीडीओई–मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, हैदराबाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी डॉ. मोहम्मद अहसन, प्रादेशिक संचालक, आरसी भोपाळ तथा प्रभारी एसआरसी अमरावती–MANUU, सादात खान, एआरडी आरसी भोपाळ–MANUU तसेच मौलाना सय्यद वासिउल्लाह, अध्यक्ष जमीयत उलेमा-ए-हिंद, अकोला यांची मान्यवर अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन

या परिसंवादाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या उपलब्ध विविध संधींची माहिती देणे तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशी जोडणे हा आहे.

परिसंवादामध्ये उच्च शिक्षण, दूरस्थ शिक्षण, विविध अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात विदर्भातील विविध लर्नर सपोर्ट सेंटर (LSC) चे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर सहभागी होणार आहेत.

रहबर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अकोलाचे सीईओ श्री. शकील अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा परिसंवाद विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande