अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार
नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)। : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी लागू करणे, नियमित पेन्शन योजना लागू करणे, आजारपणाच्या रजा व सामाजिक सुरक्षा देणे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर
Anganwadi workers will wage


Anganwadi workers will wage


नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी लागू करणे, नियमित पेन्शन योजना लागू करणे, आजारपणाच्या रजा व सामाजिक सुरक्षा देणे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर तीव्र आणि व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या भव्य मेळाव्यात करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ (NTUI) या संघटनेचा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) सोबत संलग्नता समारंभ तसेच दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम. ए. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मेळावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून, सन १९८७ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघटनात्मक लढा देत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेने केलेल्या संघर्षाची परंपरा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने आता या संघटनेने अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात आयटकशी संलग्न होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.या संलग्नतेमुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा शासकीय कर्मचारी दर्जा, ग्रॅच्युइटी, पेन्शन, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, आजारपणाच्या रजा तसेच विविध सेवाविषयक हक्कांच्या मागण्यांसाठीचा संघर्ष अधिक मजबूत आणि व्यापक होणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.मेळाव्याचे उद्घाटन आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तांबे यांनी अंगणवाडी सेविका मी लहान पनापासून पाहत आहे. मात्र 50 वर्ष योजनेला पूर्ण होत आहेत. मात्र अंगणवाडी सेविका मदतनीस प्रश्न सुटले नाहीत.प्रत्यक अधिवेशनात राज्याच्या विधान सभा, विधान परिषद मध्ये आपल्या प्रश्नाची चर्चा होते. सर्वात मोठे मोर्चे होतात मात्र प्रश्न सोडवलेले जात नाही या बद्दल खंत व्यक्त केली. महाराष्ट्र महिलांचा आदर करतो मात्र आर्थिक शोषण योजना कर्मचारी च का हा प्रश्न उपस्थित केला. अंगणवाडी, आशा, गट प्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, पोषण आहार योजना कर्मचारी प्रश्न विधान परिषद मध्ये मांडेल असे जाहीर केले. नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षण मध्ये वय 3 ते 6 वयोगट शालेय शिक्षण विभागाला जोडत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका ला शिक्षिकेचा दर्जा दिला पाहिजे, पेन्शन, ग्रॅज्युएटी हक्क आहे. यासाठी मी आपल्यासोबत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande