सेलू तालुका तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सारिका हेडगे
परभणी, 24 ऑगस्ट (हिं.स.)। सेलू तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी मंडळ अधिकारी सारिका हेडगे, तर सचिवपदी ओम कानडे यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्
सेलू तालुका तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सारिका हेडगे


परभणी, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

सेलू तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी मंडळ अधिकारी सारिका हेडगे, तर सचिवपदी ओम कानडे यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी आणि जिल्हा सचिव राजकुमार चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी तसेच तलाठी व मंडळ अधिकार्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण खंडागळे, कार्याध्यक्षपदी वैजनाथ आमदरे, सहसचिवपदी राहुल नाहटे, कोषाध्यक्षपदी मिलिंदकुमार दवणे, संघटकपदी महेंद्र गाढे यांची निवड करण्यात आली. तसेच दीपक गांगुडे, किरण गोगे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून प्रतिभा खाकरे, दीपिका गायकवाड, वैशाली बन, मीना शिंदे, श्वेता भीमपल्लवर आणि स्मिता हाककडे यांची निवड झाली. सल्लागारपदी माधव कुरवाड आणि ज्योती अडागळे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande