
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, तीळ, ज्वारी आदींसह ऊस, ठेमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर आदी हिरवी गार पीक पावसाअभावी वाळत असल्यामुळे तालुक्यातील बळीराजा हवालदिल झालेला आहे.
तालुक्यावर या ना त्या कारणाने कायम दुष्काळाचे सावट असून गेल्या दोन चार महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी राजाची चांगलीच शिस्त बिघडलेली दिसत आहे. गेल्या दोन चार महिन्यांपासून तालुक्याकडे कण राजाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजाचे आर्थिक गणितच बिघडून गेलेले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जेमतेम पावसाच्या आधारे तालुक्यातील काही भागात तुरळक प्रमाणात पेरण्या केल्या. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तालुक्यात ४५ टक्के पेरणी करण्यात आली. तर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच जुलैअखेर काही भागात १० ते १५टक्के पेरणी करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन तीन महिन्यांपासून वरुण राजाने तालुक्याकडे पाठ फिरवल्याने तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, ज्वारी, भुईमूग, आदी पीकांसह बागायती शेतीमधील ऊस, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर आदी पीक पावसा अभावी धोक्यात आलेली आहेत. तालुक्यात खरीप हंगामात पेरणीयोग्य क्षेत्र २८ हजार हेक्टर क्षेत्र असताना तालुक्यात दोन टप्प्यात अंदाजे ६० ते ६५ टक्केच पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात आज तागायत ३० ते ३५ टक्के क्षेत्र पेरणी अभावी
शिल्लक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तालुक्यात सर्वात जास्त खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून सोयाबीन पीकाकडे पाहिले जाते आणि सर्वात जास्त पेरणी सोयाबीन पीकाची करण्यात आलेली आहे. पण सध्या वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे खरी हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, ज्या आदी पीकाने पावसाअभावी माना टाकल्यामुळे हाती आलेले पीक वाया जाणार या भीतीन येथील शेतकरी पूर्णता हतबल होऊन हवालदि झालेला दिसत आहे. येणाऱ्या दोन चार दिवसाल पावसाने हजेरी नाही लावल्यास तालुक्यातील १५ ते १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक जळू जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. त शासनाच्या संबंधित विभागाकडून ज्या शेतकन्यांच्या शेतात खरीप हंगामातील सोयाबीना उडीद, मूग, तूर, ज्वारी पीक आहेत अशा शेतातील पीकांचे पंचनामे करून नुक्सान होणान्या पीांसाठी काहीतरी अनुदान देऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis