
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। सिल्लोड येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सराफा मार्केट येथील संत श्री नरहरी महाराज नामफलकास आमदार अब्दुल सत्तार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत सहभागी होऊन उपस्थित भाविक भक्त तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्यांना संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सराफा बांधवांच्या वतीने सिल्लोड शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज सामाजिक सभागृह उभारण्यासह संत श्री नरहरी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन सराफा बांधवांनी यावेळी दिले. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तसेच समाजाच्या मागणीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी न.प.तील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृउबा समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, नगरसेवक विशाल जाधव, शिवसेना शहरप्रमुख मनोज, झंवर, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, गौरव सहारे, सचिन पाखरे यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल सोनवणे, उपाध्यक्ष जयंत सोनार, मनीष सोनी, प्रशांत चिनके, सचिव- मयूर बिरारी, सुमित सराफ, वैभव सराफ, श्याम सोनार, योगेश बिरारी, संजय बिरारी, शांताराम सोनार, राजेश सराफ, जगदीश निकम, शितल गोसावी, उत्तम घोडके यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis