
नांदेड, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार ईश्वर राव भोसीकर यांना
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने 'समाजभूषण पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील निवासस्थानी भेट देऊन माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भोसीकर परिवाराच्या वतीने माझाही स्नेहादरपूर्वक सन्मान करण्यात आला, त्याबद्दल भोसीकर कुटुंबाचे मनापासून आभार!
यावेळी बाबुराव केंद्रे, राजेंद्र ईश्वरराव भोसीकर, संजय ईश्वरराव भोसीकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किसनराव डफडे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकरराव कौसल्य आदींची उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis