
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगरच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे छत्रपती संभाजीी नगर जिल्ह्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.ंं
यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विकास निधी मिळावा, यासाठी निवेदन देऊन पाठपुरावा केला.
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक निधी मिळवून विकासकामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत..
यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि गटनेते गोविंद केंद्रे यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis