
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
डीपीडीसी योजनेअंतर्गत लासुर ते माळीवाडगाव येथे ६३ लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कृषी वाहिनीचे लोकार्पण छत्रपती संभाजी नगरचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्वतंत्र कृषी वाहिनीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करून त्यांच्या शेतीला बळ देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
यावेळी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात माझा सन्मान करण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. या सन्मानाचा मनापासून स्वीकार करत सर्व नागरिकांचे आभार मानले.
लासुर- माळीवाडगाव परिसराच्या विकासासाठी आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis