‘नमो दहीहंडी २०२६’साठी गारखेडा मंडळात आढावा बैठक
छत्रपती संभाजीनगर, २६ ऑगस्ट (हिं.स.) : आगामी ‘नमो दहीहंडी २०२६’च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा मंडळ येथे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या नियोजनासह विव
अ


छत्रपती संभाजीनगर, २६ ऑगस्ट (हिं.स.) : आगामी ‘नमो दहीहंडी २०२६’च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा मंडळ येथे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या नियोजनासह विविध उपक्रमांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा मोठ्या स्वरूपातील विविध उपक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली. ‘नमो दहीहंडी २०२६’ हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन, आयोजनाची तयारी, कार्यकर्त्यांवरील विविध जबाबदाऱ्या तसेच आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. दहीहंडी उत्सव भव्य, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande