
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सिल्लोड शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त दरवर्षी प्रमाणे सिल्लोड तालुका टॅक्सी युनियन संघटनेच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला.तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, नगरसेवक जुम्मा खा पठाण, रईस मुजावर, शेख बाबू, सत्तार हुसेन, शेख इमरान उर्फ गुड्डू, नूर मोहम्मद कुरेशी, मतीन देशमुख, फईम पठाण यांच्यासह टॅक्सी युनियन संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख कलीम, उपाध्यक्ष शेख शकील अहमद, सचिव सय्यद शमीम उर्फ कालू दादा, शेख अजहर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis