
छत्रपती संभाजीनगर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे शिवसेनेचे प्रेरणास्थान वंदनीय स्व. आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास उपस्थित राहून वंदनीय स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, न.प. शिवसेना गटनेते सुधाकर पाटील,कृउबा समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, नगरसेवक सुधाकर गायकवाड, शेख बाबू, अशोक बन्सोड, सत्तार हुसेन, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, प्रशांत क्षीरसागर, शिवा टोम्पे, संदीप हाडोळे, मानसिंग राजपूत, राजेंद्र साठे, जगन्नाथ कुदळ, सुरेश प्रशाद शर्मा, फईम पठाण, आनंद दुधे, भाऊराव दुधे, रामू सुरडकर, सुनील पांडुरंग दुधे, गौरव प्रसाद, कचरू दुधे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis