लातूर : प्रभाग ३ मधील महिलांनी घेतला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ
लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मोफत शिलाई प्रशिक्षण घेऊन ५३ महीला झाल्या स्वावलंबी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि त्यांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी मिळावी, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील संत गोरोब
स्वयंरोजगार प्रशिक्षण


लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)।

मोफत शिलाई प्रशिक्षण घेऊन ५३ महीला झाल्या स्वावलंबी

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि त्यांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी मिळावी, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील संत गोरोबा सोसायटी येथे चालवण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा समारोप सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ५३ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'ट्वेंटीवन ॲग्री लि.'च्या संचालिका सौ. अदितीताई देशमुख यांच्या विशेष पुढाकारातून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते. या केंद्रात परिसरातील महिलांना सलग २ महिन्यांचे व्यावसायिक शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीत शिलाईच्या विविध आधुनिक पद्धती, नवीन डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान महिलांना देण्यात आले. प्रशिक्षक प्रेमा ठाकूर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ५३ महिलांनी शिलाई कामातील बारकावे व आवश्यक सर्व कौशल्ये आत्मसात केली.

प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संत गोरोबा सोसायटी येथे उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे प्रभागातील महिलांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सोहळ्याला स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक विकास कांबळे, काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हा प्रमुख प्रवीण सूर्यवंशी, विलासराव देशमुख फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे व आशिष सदाकाळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande