
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । नाचणे (ता. रत्नागिरी) येथील केंद्रीय विद्यालयात पहिली ते पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया येत्या ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी हे प्रवेश सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी खुले असून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. अधिकृत प्रवेश नोंदणी अर्ज शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले जाणार असून, इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज भरून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केंद्रीय विद्यालय नाचणे, लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्र. २, रत्नागिरी – ४१५६३९ (संपर्क दूरध्वनी: ०२३५२-२५३६५४) येथे ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक असे - अर्ज वाटप व नोंदणी सुरू होण्याची तारीख: गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६. अर्ज भरून जमा करण्याची अंतिम तारीख: मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६. अर्ज मिळण्याची व जमा करण्याची वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंतइयत्तानिहाय आवश्यक ३१ मार्च २०२६ रोजी अशी - इयत्ता पहिली: ६ ते ८ वर्षे, इयत्ता दुसरी: ७ ते ९ वर्षे, इयत्ता तिसरी: ८ ते १० वर्षे, इयत्ता चौथी: ९ ते ११ वर्षे, इयत्ता पाचवी: १० ते १२ वर्षेप्रवेशविषयक सविस्तर मार्गदर्शक सूचना व अधिक माहितीसाठी पालकांनी शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा www.kvsangathan.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी