
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा परिषद कामवाटप समितीची सभा येत्या गुरुवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठीच्या कामवाटप समितीची ही सभा गुरुवारी दुपारी १२ वाजता सुरू होईल. ती जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) यांच्यासाठी १० लाखांच्या मर्यादेतील कामांचे वाटप करण्यात येणार आहे. संबंधित संस्था व अभियंत्यांनी या सभेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कामवाटप समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी