राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अकोला महानगर संघटनेत महत्त्वाच्या नियुक्त्या
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या प्रदेश कार्यालयात आज अकोला महानगर संघटना अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार
Photo


अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या प्रदेश कार्यालयात आज अकोला महानगर संघटना अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे प्रदेश कार्यालय सरचिटणीस रविंद्र पवार, माजी प्रदेश युवा अध्यक्ष महबूब शेख, महाराष्ट्र राज्य शहर प्रदेशाध्यक्ष (शहरी युवक अध्यक्ष) विशाल शंकर वाकडकर, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, अकोला महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी तसेच महानगर कार्याध्यक्ष देवानंद ताले उपस्थित होते.यावेळी इनुलहाक कुरेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अकोला महानगर महासचिव म्हणून, फिरोज खान यांची अकोला पश्चिम महानगराध्यक्ष म्हणून, तर देवानंद राऊत यांची युवा महानगराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रोहित पवार तसेच प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले. संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.या नव्या नियुक्त्यांमुळे अकोला महानगर संघटनेला नवी ऊर्जा मिळेल तसेच आगामी राजकीय व जनहिताच्या कामांमध्ये पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande