भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा कोरिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली, ६ ऑगस्ट (हिं.स.)भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू, तन्वी शर्माने आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवत कोरिया मास्टर्स २०२६ च्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तन्वीने भारताच्याच श्रीयांशी वलिशेट्टीचा २१-१६, १७-२१, २१-१३ असा
तन्वी शर्मा


नवी दिल्ली, ६ ऑगस्ट (हिं.स.)भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू, तन्वी शर्माने आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवत कोरिया मास्टर्स २०२६ च्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तन्वीने भारताच्याच श्रीयांशी वलिशेट्टीचा २१-१६, १७-२१, २१-१३ असा पराभव केला. आता तिचा सामना आणखी एक भारतीय बॅडमिंटनपटू, रक्षिता श्री रामराजशी होणार आहे. तिने जपानच्या मनामी सुइजुचा २२-२०, २१-१० असा पराभव केला.

गेल्या आठवड्यात तैपेई ओपन सुपर-३०० चे विजेतेपद पटकावून इतिहास रचणाऱ्या १७ वर्षीय तन्वीने पुन्हा एकदा आपला झुंजारपणा दाखवला. तिने आपली विजयी मालिका कायम ठेवली आणि या महिन्यात भारतात होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले.

अखिल भारतीय स्पर्धेच्या पहिल्या गेममध्ये तन्वीची सुरुवात खराब झाली आणि ती सुरुवातीच्या गुणांमध्येच मागे पडली. तथापि, आपल्या चपळ हालचाली आणि आक्रमक फटक्यांच्या जोरावर तिने जोरदार पुनरागमन करत २१-१६ असे महत्त्वपूर्ण गुण जिंकले.

दुसऱ्या गेममध्ये श्रीयांशी वलिशेट्टीने जोरदार पुनरागमन केले. मध्यंतरापर्यंत तिने ११-६ अशी आघाडी घेतली आणि आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. तन्वीने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीयांशीने आपला संयम राखला आणि दुसरा गेम २१-१७ ने जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला.

निर्णायक गेममध्ये तन्वीचे पूर्णपणे वर्चस्व होते. तिने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि संपूर्ण गेममध्ये श्रीयांशीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानावर असलेल्या तन्वीने उत्कृष्ट नियंत्रण राखत तिसरा गेम २१-१३ ने जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande