
परभणी, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गावातून पंथसंचलन करण्यात आले. गणेश महोत्सव अनुषंगाने खबरदारीचा भाग म्हणून चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनात बसस्थानकपासून गावातील देशमुख चौक, महाविर चौक, बाजारपरिसर, पेठविभाग आदी मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचनात पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, गुप्पतचर विभागाचे उमेश बारहाते, पोहेका उध्दव माने , उध्दव सातपूते यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis