छ. संभाजीनगर : दुर्मीळ कासवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्मीळ कासवाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. सिल्लोड-पाथरी टोलनाक्याजवळ अर्टिगा कारमधून कासवाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्मीळ कासवाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. सिल्लोड-पाथरी टोलनाक्याजवळ अर्टिगा कारमधून कासवाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पैशांचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन शोधण्यासाठी अंधश्रद्धेतून कासवाची तस्करी होत असल्याचे तपासात समोर आले. कासव व वाहन जप्त करून वडोदबाजार पोलिसांत वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande