
पाच जिवंत बैलांसह १३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड, १५ सप्टेंबर (हिं.स.) : गोवंशाची दाटीवाटीने व निर्दयी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनावर संभाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच जिवंत बैलांसह अशोक लेलँड पिकअप वाहन असा एकूण १३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी रात्री गोपीनाथ मुंडे चौक ते इटके कॉर्नर मार्गावर करण्यात आली.
पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाच बैलांची दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी श्याम झगडे आणि तमीम कुरेशी यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis