रत्नागिरी : राजापूर पालिकेतर्फे 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत योग प्रशिक्षण शिबिर
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर नगरपालिकेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राजापूरच्या राजीव गांधी मैदान अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये या विशेष योग
रत्नागिरी : राजापूर पालिकेतर्फे 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत योग प्रशिक्षण शिबिर


रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर नगरपालिकेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

राजापूरच्या राजीव गांधी मैदान अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये या विशेष योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर पालिका आणि एस फिटनेस सेंटर राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी योगासनांचे अत्यंत महत्त्व आहे. त्यासाठीच शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या नावनोंदणीसाठी 9112492135 किंवा 8655939762 या क्रमांकावर तसेच राजापूर पालिकेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योग प्रशिक्षण शिबिरासाठी राजापूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे व उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande