सिद्धेश्वर वनविहारात २० प्रजातींच्या फुलपाखरांचे दर्शन; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। बिग बटरफ्लाय मंथनिमित्त वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर (WCAS) यांच्या वतीने सिद्धेश्वर वनविहार येथे बटरफ्लाय वॉक’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, पर्यावरणप्रेमी आणि चिमुकल्या निसर्गप्
सिद्धेश्वर वनविहारात २० प्रजातींच्या फुलपाखरांचे दर्शन; चिमुकल्यांचा उत्साह शिगेला


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

बिग बटरफ्लाय मंथनिमित्त वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर (WCAS) यांच्या वतीने सिद्धेश्वर वनविहार येथे बटरफ्लाय वॉक’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, पर्यावरणप्रेमी आणि चिमुकल्या निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवानंद हिरेमठ यांनी उपक्रमाची माहिती दिली. पक्षीतज्ज्ञ निनाद शहा यांनी सिद्धेश्वर वनविहारातील जैवविविधतेविषयी आपले अनुभव उपस्थितांशी शेअर केले. त्यानंतर सहभागी वन्यजीवप्रेमींचे विविध गट करण्यात आले. अजित चौहान, सचिन पाटील आणि संतोष धाकपाडे यांनी गटांचे प्रतिनिधित्व केले.पहाटेची वेळ असल्याने वनविहार परिसरात मोठ्या संख्येने फुलपाखरे दिसून आली. रंगीबेरंगी फुलपाखरे भिरभिरताना पाहून चिमुकल्या पर्यावरणप्रेमींचा उत्साह वाढला. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे फुलपाखरांचे छायाचित्रण केले.या वॉकदरम्यान व्हाईट ऑरेंज टीप, यल्लो ऑरेंज टीप, कॉमन गल, कॉमन रोझ, क्रिमसन रोझ, कॉमन रेड फ्लॅश, लार्ज सॅल्मन अरब, ग्रेट एगफ्लाय, कॉमन एमिग्रंट, कॉमन ग्रास यल्लो, अँगल्ड कास्टर, कॉमन पेरिओट, कॉमन सिल्व्हरलाईन, सायके, पायोनिअर यांसह सुमारे २० प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली.फुलपाखरू अभ्यासक अजित चौहान आणि सचिन पाटील यांनी विविध प्रजाती, त्यांचे खाद्य, पर्यावरणातील महत्त्व तसेच फुलपाखरांचा जीवनक्रम याबाबत माहिती दिली. फुलपाखरूप्रेमी ओम धुत्तरगांवकर यांनी सिद्धेश्वर वनविहारात टॉनी कॉस्टर प्रजातीच्या फुलपाखराचा होस्ट प्लांट आणि अंडी शोधून त्याची छायाचित्रे व नोंद केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande