छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी भाजपच्या सुरेश बनकर यांची नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश पांडुरंग बनकर यांची नियुक्ती केली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. संघट
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुरेश पांडुरंग बनकर यांची नियुक्ती केली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. संघटनात्मक नियुक्ती अंतर्गत बनकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्ह्याची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती तत्काळ लागू करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सुरेश बनकर हे यापूर्वी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहिले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande