उत्तर सोलापुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची चर्चा सुरू असून, बीबी दारफळ जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटातून निवडून आलेले इंद्रजीत पवार सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच
Zp


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात सध्या नव्या समीकरणांची चर्चा सुरू असून, बीबी दारफळ जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटातून निवडून आलेले इंद्रजीत पवार सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच अर्थ व बांधकाम सभापती आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे आणि आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

काका विरुद्ध भाऊ अशी रंगली होती लढत

बीबी दारफळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे विरुद्ध इंद्रजीत पवार अशी चुरशीची ठरली होती. या लढतीत पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत गटाचे प्रतिनिधित्व आपल्या हातात घेतले. निवडणुकीदरम्यान दोन्ही बाजूंनी राजकीय ताकद पणाला लागली होती. त्यामुळे निकालानंतर या संघर्षाचे पडसाद पुढील राजकारणातही उमटतील, अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र अपेक्षेपेक्षा वेगळे असल्याचे बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande