परभणीत ग्रामीण शालेय कुस्ती स्पर्धेत पंच निवडीवर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी येथे राजे संभाजी तालीम येथे पार पडलेल्या वयो गटातील कुस्ती स्पर्धेत पंचांची निवड चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पंकज आर. सोनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशी करण्याची मागणी
परभणीत ग्रामीण शालेय कुस्ती स्पर्धेत पंच निवडीवर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी


परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी येथे राजे संभाजी तालीम येथे पार पडलेल्या वयो गटातील कुस्ती स्पर्धेत पंचांची निवड चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पंकज आर. सोनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून काम करणारे व्यक्ती हे राज्य संघटनेचे पंच नसून घरातीलच मुले व भाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गणवेश परिधान केलेल्या व्यक्तीलाही पंच म्हणून काम देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. नियमानुसार सदर खेळासाठी किमान १० पंच असणे आवश्यक असताना आवश्यक संख्येने पंच उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार, तसेच पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली होती का, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. “अतिरिक्त क्रीडा गुण व अतिरिक्त खेळाचे गुण मिळविण्यासाठी खेळाडू खेळविण्यात आले, मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?” असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande